पाठदुखी हि भारतातील अनेक लोंकासाठी एक चिंतेची बाब आहे. सर्वाधिक लोकांनां जीवनात कधीनाकधी पाठदुखीमुळे त्रास होतो. खासकरून स्त्रियां आणि प्रौढांना पाठदुखीचा जास्त त्रास होतो.
जड वस्तू उचलणे, सदानकदा बसून राहणे आणि अपघात अश्या गोष्टींमुळे पाठीचे दुखणे वाढते, तर काही वेळा विविध आजारांमुळे कायमचे दुखत राहते. सारख्या पाठदुखीमुळे केवळ दैनंदिन जीवन खराब होत नाही तर आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव सुद्धा होतो.
मणक्याचे आजार
मणक्याचे काही आजार पाठदुखीला कारण ठरतात. खाली मणक्याचे सामान्यतः आढळणारे आजार दिलेले आहेत आणि अशावेळी होणाऱ्या वेदनांवर इलाज कसा होऊ शकतो यावर आपण चर्चा करू.
हर्निएटेड डिस्क
आपल्या पाठीची रचना मणक्याच्या विशेष हाडांमुळे बनते. या हाडांच्या मध्यभागी खास चकतीं (डिस्क) असतात, त्यामधील जेलसारख्या पदार्थामुळे आपला मणका लवचिक राहतो.
जेव्हा एखादी चकती हर्नियेटेड होते, तेव्हा तिच्या आतील पदार्थ सरकतो आणि संरक्षक आवरणातून बाहेर पडतो. हा पदार्थ बाहेरील मज्जातंतूंना स्पर्श करतो ज्यामुळे वेदना होतात.
जरी काही प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी मणक्यातील मज्जातंतू दबून वारंवार समस्या निर्माण होऊ शकतात.
स्नायूंचा ताण
थकवा, तणाव आणि चुकीच्या पद्धतीत बसून राहण्याने मणक्याच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे मानेपासून मागच्या भागात वेदना आणि कडकपणा येऊ शकतो.
पाठीच्या स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी, अतिरिक्त वजन उचलू नका आणि योग्य व्यायाम करा. जड मेहनत करताना स्नायूंवर ताण येऊ नये यासाठी वॉर्मअप करणे जरुरी आहे.
स्कोलियोसिस
स्कोलियोसिस हा एक असा आजार आहे जिथे मणका वाकडा होतो. हा आजार सौम्य किंवा गंभीर असू शकतो. भारतात या आजाराबद्दल पुरेसा अभ्यास झालेला नाही. तथापि, युनायटेड स्टेट्समध्ये, सुमारे २-३% लोकसंख्या स्कोलियोसिसने ग्रस्त आहे.
धक्का लागून झालेली इजा (व्हिपलॅश)
अचानक धक्का लागल्याने मानेला दुखापत होऊ शकते. असा धक्का मानेचे स्नायू ताणू शकतो. यामुळे मान आणि खांद्यामधील सांधे, चकतीं आणि अस्थिबंधनांवर परिणाम होतो आणि तीव्र वेदना होतात.
अशा आघातानंतर, बऱ्याच लोकांना सुरुवातीला कोणताही त्रास वाटत नाहीत, परंतु नंतर लक्षणे जाणवू लागतात.
ऑस्टियोपोरोसिस
ऑस्टिओपोरोसिस हा वृद्धांमध्ये बहुतेक वेळा आढळतो. यामध्ये हाडांची घनता कमी असल्यामुळे मणक्यातील हाडे ठिसूळ आणि खराब होतात. अश्या आजारात फ्रॅक्चर, कण्याची हाडं संकुचित होणे आणि शरीर पुढे वाकणे, अशी लक्षणं सामान्यतः दिसून येतात.
कम्प्रेशन फ्रॅक्चर
हा प्रकार वृद्ध लोकांमध्ये जास्त आढळून येतो. येथे हाडे इतकी कमजोर असतात की त्यांना बारीक तडे पडतात, ज्यांना हेअरलाइन फ्रॅक्चर म्हटले जाऊ शकते. यामुळे मणक्याच्या हाडांवर परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मणक्यामध्ये अशे तडे असतील, तर तो मणका कमकुवत होऊन त्याची पडझड होऊ शकते.
ऑस्टियोआर्थराइटिस
बऱ्याच लोकांना संधिवात होतो आणि त्याचा हात आणि अंगांवर गंभीर परिणाम होतो. या आजारामध्ये सांध्याची जळजळ होते आणि वेळेवर उपचार न केल्यास स्थिती आणखी वाईट होऊ शकते.
पाठीच्या विकारांसाठी शस्त्रक्रियाविरहित उपाय
बहुतेक प्रकरणांमध्ये, शारीरिक उपचार आणि औषधांच्या मदतीने त्रास कमी केला जातो. सर्वात प्रमुख उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
- शारीरिक उपचार (फिझिकेल थेरपी): तीव्र पाठदुखी असलेल्या रूग्णांचे आरोग्य सांभाळणे हे महत्वाचे आहे. इतर उपचारांआधी, शारीरिक व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. यासाठी डॉक्टर आणि फिजिकल थेरपिस्ट यांच्या सांगण्यानुसार व्यायाम करणे जरुरी आहे.
- जागरूकता आणि ध्यान: रुग्णांचे शारीरिक आणि भावनिक आरोग्य महत्वाचे आहे. चिडचिडेपणा, नैराश्य आणि इतर मानसिक परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला एका मानसशास्त्रज्ञाकडून मदत मिळू शकते.
- आहार बदल: आहारातील काही घटक अपायकारक असतात, विशेषत: ट्रान्स फॅट्स, शुद्ध साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. बरे होण्यासाठी असा आहार टाळणे महत्वाचे आहे.
- जीवनशैलीत बदल: शरीरावर होणारा अनावश्यक ताण टाळून, पाठदुखी कमी केली जाऊ शकते. यासाठी धूम्रपानासारख्या हानिकारक सवयीं सोडा आणि आरामदायी, मजेदार शारीरिक क्रीडांना प्राधान्य द्या.
- इंजेक्शन-आधारित उपचार: ट्रिगर पॉइंट इंजेक्शन्स, एपिड्युरल स्टिरॉइड इंजेक्शन्स, नर्व्ह ब्लॉक्स, नर्व्ह ॲब्लेशन्स आणि इतर इंजेक्शन दिली जाऊ शकतात.
- औषधी (फार्माकोलॉजिकल) उपचार: दीर्घकालीन पाठदुखीसाठी अनेक औषधे दिली जातात. सर्वसामान्यपणे अँटी-इंफ्लेमेशन, स्नायू शिथिल करणारे, मज्जातंतूंच्या संसर्गाची औषधे आणि अँटीडिप्रेसन्ट्ही दिली जातात.
- इतर पर्यायी उपचार: ॲक्युपंक्चर, मसाज, बायोफीडबॅक थेरपी, लेसर आणि इलेक्ट्रिकल नर्व्ह स्टिम्युलेशन थेरपी, आणि इतर उपचारही उपलब्ध आहेत.
- नॉन-सर्जिकल स्पायनल डीकॉम्प्रेशन: हा शस्त्रक्रियाविरहित उपचार आहे जो मणक्याच्या डिस्क्स पुन्हा बऱ्या करण्यास मदत करतो. येथे डीकॉम्प्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करून त्या रुग्णांना दीर्घकालीन आराम दिला जातो जे डिस्कसंबंधित पाठदुखीने त्रस्त आहेत.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉनसर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे, ANSSI रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.