आपल्या शरीरातील मणक्याची रचना म्हणजेच “स्पाईन” ही आपल्या संपूर्ण हालचालीचा एक आवश्यक भाग आहे. परंतु, वय वाढल्यासोबत आणि चुकीच्या सवयींमुळे या मणक्यामध्ये झीज होण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला स्पाइनल डीजनरेशन असे म्हटले जाते. ही समस्या एकदा सुरू झाली, की ती पुढे वाढतच जाते आणि अनेकदा तीव्र पाठदुखी, नसांवर ताण, हात-पाय सुन्न होणे यांसारख्या त्रासांना जन्म देते.
अनेक लोकांना वाटते की यावर उपाय म्हणजे औषधे, इंजेक्शन्स, किंवा अंतिम टप्प्यावर शस्त्रक्रिया. पण सत्य हे आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेसे बदल करून या समस्येपासून लांब राहू शकतो – आणि तेही औषधे, इंजेक्शन्स किंवा शस्त्रक्रियेशिवाय!
स्पाइनल डीजनरेशन म्हणजे काय?
स्पाइनल डीजनरेशन म्हणजे मणक्याच्या हाडांमधील डिस्क्स हळूहळू झिजत जाणे.
स्पाइनल डिस्क पाठीवर पडणारे धक्के कुशनसारखे शोषून घेतात आणि पाठीच्या कण्याला त्याची लवचिकता प्रदान करतात. वयानुसार काही स्पाइनल डिस्कची उंची कमी होते, त्यातील लवचिकता नष्ट होते, आणि त्यामुळे मणक्याची हाडे एकमेकांवर घासायला सुरवात करतात.
या झिजीमुळे शरीरात वेदना, कडकपणा (stiffness), आणि हालचालीतील मर्यादा, यांबरोबर काही वेळा कण्यातील नसांवर दबाव पडल्यामुळे सुन्नपणा किंवा कमजोरी निर्माण होते.
लवकर काळजी घेणे महत्त्वाचे का आहे?
एकदा डिस्क्स झिजायला सुरुवात झाली, की मग परिस्थिती आणखी बिकट होत जाते. त्यामुळे लवकर काळजी घेणे महत्त्वाचे आहे, तरंच आपण ही झीज वाढण्याआधीच ती थांबवू शकतो. आपल्या जीवनशैलीत काही योग्य सवयी अंगीकारून आपण या झीजेचा वेग कमी करू शकतो, आणि काही वेळा ती पूर्णपणे टाळूही शकतो.
मणक्याच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनशैलीतील बदल
१. योग्य पोश्चर राखणे (बसणे, उभे राहणे, आणि झोपण्याची पद्धत)
- कामाच्या वेळी कंबरेला आधार देणाऱ्या खुर्चीचा वापर करा.
- संगणकाचे स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवा.
- झोपताना गादी न खूप मऊ असावी, न खूप कडक.
- उशी मध्यम उंचीची आणि मानेला योग्य आधार देणारी असावी.
२. संतुलित आहार
- कॅल्शियम (दूध, दही, पनीर, राजगिरा) हाडांसाठी आवश्यक आहे.
- व्हिटॅमिन D (सूर्यप्रकाश, अंडी, मासे) हाडं मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
- अँटी-इंफ्लेमेटरी आहार (हळद, आले, ओमेगा ३ फॅटी अॅसिड) सूज कमी करण्यास मदत करतो.
३. पाणी प्या – डिस्क्ससाठी हायड्रेशन जरुरी आहे
मणक्यांमधील डिस्क्स ८०% पाण्याने भरलेल्या असतात. पुरेसे पाणी न मिळाल्यास त्या कोरड्या पडतात, ज्यामुळे त्यांची लवचिकता कमी होते आणि झीज वाढते. रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
४. वजन नियंत्रणात ठेवा
अति वजनामुळे कंबरेवर अधिक भार येतो. विशेषतः पोटाजवळील चरबी मणक्यांवर सतत दाब टाकते, ज्यामुळे डिस्क्सची झीज होते. वजन नियंत्रणासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
५. धूम्रपान थांबवा
धूम्रपानामुळे मणक्यामधील रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी, तिथे पोषण मिळत नाही आणि डिस्क्स लवकर झिजतात. या सवयीपासून दूर राहणे मणक्याच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
६. एर्गोनॉमिक जीवनशैली स्वीकारा
ऑफिस किंवा घरात काम करताना फर्निचरची रचना अशी असावी की मणक्यावर ताण येऊ नये. लॅपटॉप वापरताना उंची योग्य ठेवा, काम करताना सतत एकाच पोझिशनमध्ये न बसता दर ३०-४५ मिनिटांनी उठून २ मिनिटे चालणे गरजेचे आहे.
हलका व्यायाम – नियमित हालचाल ठेवा
पाठीसाठी कोणताही अति थकवणारा व्यायाम नको. पण हलक्या हालचाली, जसे की दररोज ३० मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग, किंवा सौम्य योगासने, यामुळे मणक्याला लवचिकता मिळते. सतत एका जागी न बसता हालचाल केल्यास झीज होण्याचा धोका कमी होतो.
आजचा बदल, उद्याचे आरोग्य
स्पाइनल डीजनरेशन ही एक अटळ प्रक्रिया वाटत असली तरी आपण आपल्या सवयींमध्ये साधे बदल करून या समस्येला दूर ठेवू शकतो. वेळेत उचललेली पावले आपल्याला पाठदुखीपासून वाचवू शकतात आणि मणक्याचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतात.
जर स्थिती आणखी बिघडली तर वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्वाचे आहेत. फिजिओथेरपी आणि नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट सारख्या शस्त्रक्रियाविरहित उपचारांमुळे नैसर्गिक उपचार प्रक्रिया सुलभ होऊन दीर्घकालीन आराम मिळू शकतो.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.