मानदुखी ही खूपच त्रासदायक असू शकते आणि दैनंदिन कामांवरती नकारात्मक परिणाम करू शकते. त्याबरोबर जर पुन्हा-पुन्हा होणारी डोकीदुखीही होत असेल, तर परिस्थिती त्रासदायक होऊ शकते! मानदुखी व डोकेदुखी यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा मानेशी संबंधित समस्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात, तर काहीवेळा डोकेदुखीमुळे मानदुखी होते. यावर उपाय शोधण्यासाठी, या दोन्ही गोष्टींबद्दल थोडी अजून माहिती मिळवूया.
मानदुखीमुळे डोकेदुखी कशी होते?
मानदुखीशी संबंधित डोकेदुखी सामान्यतः दीर्घकालीन स्वरूपाची असते आणि ती विविध कारणांनुसार वेगवगळ्या स्वरूपाची असते. सर्व्हिकल नर्व्ह (मानेशी संबंधित मज्जातंतू) वेदनांचे संकेत पाठवतात आणि मानेशी संबंधित समस्यामुळे सर्व्हिको-जेनिक डोकेदुखी निर्माण होऊ शकते. यामुळे मानदुखी, अकडलेपणा, मळमळ, दृष्टी धूसर होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
याचप्रमाणे, ऑक्सिपिटल न्यूराल्जिया नावाच्या स्थितीमुळे निर्माण झालेली मानेतील चिमटलेली नस (पिंच्ड नर्व्ह) तीव्र डोकेदुखी निर्माण करू शकते.
मानदुखीची कारणे
मानदुखी ही अनेक घटकांमुळे होऊ शकते, जसे की स्नायू किंवा लिगामेंटला ताण, दुखापती किंवा मानेशी संबंधित समस्या.
मानदुखीची सर्वसामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- चुकीच्या शारीरिक मुद्रेमधे सतत राहणे
- टेबलवर बसून दीर्घकाळ काम करणे
- मानेच्या स्नायूंमध्ये अकडलेपणा
- मानेच्या दुखापती
- चुकीच्या शारीरिक मुद्रेमधे मोबाईलचा वारंवार वापर
- झोपेच्या अयोग्य स्थिती
- हर्नियेटेड किंवा फुगलेली डिस्क
- मानेतील चिमटलेली नस
मानदुखीला कारणीभूत असणारे डोकेदुखीचे प्रकार
मायग्रेन (अर्धशिशी):
मायग्रेन ही पुन्हा-पुन्हा होणारी डोकेदुखी आहे, ज्यात डोक्याच्या एका बाजूला मध्यम ते तीव्र वेदना होतात. यासोबत मळमळ आणि उजेड किंवा मोठ्या आवाजाची संवेदनशीलता वाढते. मायग्रेन होण्याआधी किंवा दरम्यान मानदुखी सामान्यपणे आढळते.
मायग्रेनला कारणीभूत घटक:
- मानसिक ताण
- हार्मोन्समधील बदल
- हवामानातील बदल
- वारंवार उपाशी राहणे
टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट (TMJ) डिसऑर्डर्स:
TMJ डोकेदुखी ही कानशीलाजवळ सुरू होणारी सौम्य वेदना असते आणि ती कानदुखीसारखी वाटू शकते.
TMJ डिसऑर्डर्समुळे निर्माण होणारी डोकेदुखी खालील कारणांनी होऊ शकते:
- आनुवंशिकता
- स्नायू किंवा लिगामेंट्सची झीज
- TMJ ला झालेली इजा
- TMJ विस्थापित होणे
- स्नायूंचा थकवा किंवा कमकुवतपणा
- जबड्याचा संधिवात
मानदुखीशी संबंधित डोकेदुखीची कारणे
खालील कारणांमुळे मानदुखीशी संबंधित डोकेदुखी होऊ शकते.
- इजा: मानेच्या स्नायूंना किंवा लिगामेंट्सना झालेली इजा सर्व्हिको-जेनिक डोकेदुखी निर्माण करते.
- जळजळ (इन्फ्लेमेशन): स्नायू, मज्जातंतू, टेंडन्स किंवा सांध्यांच्या जळजळीमुळे डोकेदुखी होऊ शकते.
- दीर्घकालीन मानदुखी: ताण, तणाव, किंवा थकव्यामुळे मानेतील स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
मानेतील चिमटलेल्या मज्जातंतूवर उपचार
मानेतील चिमटलेल्या मज्जातंतूवर खालीलप्रमाणे उपचार केले जाऊ शकतात:
- फिजिकल थेरपी (शारीरिक उपचार): स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व ताण सोडवण्यासाठी योग्य व्यायाम दिला जातो, जो मानेच्या हालचालींची क्षमता सुधारतो आणि वेदना कमी करतो.
- इंजेक्शन्स: काही वेळा डॉक्टर जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन्सची शिफारस करतात, जोपर्यंत मज्जातंतू बरे होत नाहीत.
निष्कर्ष:
मानदुखी व डोकेदुखीवरील उपचार हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात, कारण त्यावर अनेक घटक प्रभावी असतात – जसे की समस्या सौम्य आहे का गंभीर किंवा कोणती लक्षणे आणि कारणे जबाबदार आहेत?
जर तुम्हाला मानदुखी व डोकेदुखी जाणवत असेल आणि त्याचे कारण स्पायनल डिसऑर्डर असतील, तर विनामूल्य सल्ल्यासाठी आमच्या स्पाइन तज्ञांची भेट घ्या.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे, ANSSI रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.
काही प्रश्न:
मी कसे ओळखू शकेन की मला मानेमुळे डोकेदुखी होत आहे?
जर तुमची डोकेदुखी मानेत सौम्य वेदनेने सुरू होत असेल आणि डोक्याच्या मागील बाजूकडे पसरत असेल, तर मानेशी संबंधित समस्या त्यामागचे कारण असू शकते.