स्लिप्ड डिस्कची लक्षणे
स्लिप्ड डिस्क ही एक सर्वत्र आढळणारी स्थिती आहे जी वृद्ध व्यक्तींमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये आढळते. तथापि, प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे आणि वेदनांचे प्रकार वेगळे असू शकतात. काहीवेळा, लक्षणांच्या अभावामुळे स्वतःला स्लिप्ड डिस्क आहे हे लोकांना कळतही नाही.
स्लिप्ड डिस्कची काही सामान्य लक्षणे अशी आहेत:
- खालच्या पाठीची वेदना
- पाठीला सरळ ठेवण्यामध्ये किंवा खाली वाकण्यामध्ये अडचण
- शरीराच्या एका बाजूला वेदना आणि सुन्नपणा
- मान, खांदे, हात, मनगट, पाय किंवा पावलापर्यंत पसरलेली वेदना
- रात्री किंवा विशिष्ट हालचाल केल्यानंतर तीव्र होणारी वेदना
- दीर्घकाळ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर वाढणारी वेदना
- प्रभावित भागात सुन्नपणा, झिणझिण्या किंवा जळजळ
- अज्ञात कारणामुळे स्नायूंची अशक्तपणा
स्लिप्ड डिस्कची कारणे
स्लिप्ड डिस्क होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. काही सर्वसामान्य कारणे अशी आहेत:
- वयानुसार डिस्कचा ऱ्हास
- अचानक, चुकीची हालचाल
- पुन्हा पुन्हा जड वजन उचलणे
- जड व्यायाम
- शारीरिक कष्टांची नोकरी
- लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव
- यंत्रे वापरताना किंवा वाहन चालवताना होणारी कंपने
स्लिप्ड डिस्कचे निदान
स्लिप्ड डिस्कचे निदान एका साधारण शारीरिक तपासणीने सुरू होते, ज्या दरम्यान एक वैद्यकीय तज्ञ वेदनेचे मूळ, लक्षणे, होणाऱ्या संवेदनेचा प्रकार, मज्जातंतूंचे कार्य, स्नायूंची ताकद आणि प्रतिक्षेप क्रियांची तपासणी करतात.
त्यानंतर तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल आणि वेदना सुरू होण्यास कारणीभूत ठरलेल्या कोणत्याही विशिष्ट घटनेबद्दल विचारणा केली जाईल.
निदानाची पुढील पायरी म्हणजे इमेजिंग चाचण्या, ज्याद्वारे पाठीचा कणा आणि जवळील भागांचे तपशीलवार चित्र तयार केले जाते. स्लिप्ड डिस्कच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या काही सर्वसामान्य इमेजिंग चाचण्या अश्या आहेत:
- एमआरआय
- एक्स-रे
- सीटी स्कॅन
- मायेलोग्राम
- डिस्कोग्राम
- इलेक्ट्रोमायोग्राम
चाचण्यांच्या निकालांनुसार, डॉक्टर वेदनेचे कारण, स्लिप्ड डिस्क आहे का आणि असल्यास त्याचे स्थान, तीव्रता आणि जवळील मज्जातंतूंवर होणारा संभाव्य परिणाम ठरवतील.
स्लिप्ड डिस्कचे उपचार
तुमच्या वरच्या पाठीच्या वेदनांवर १००% शस्त्रक्रियाविना स्पाइनल डी-कंप्रेशन उपचाराने मात करा!
ANSSI च्या USA-पेटंट तंत्रज्ञानाद्वारे नॉन-सर्जिकल स्पाइनल डी-कम्प्रेशन उपचारासकट शस्त्रक्रियेशिवाय पाठीच्या विविध विकारांनी ग्रस्त ३५००+ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
ही USA जर्नल ऑफ क्लिनिकल रिसर्चद्वारे मान्यताप्राप्त शस्त्रक्रिया, स्टेरॉइड इंजेकशन्स आणि वेदनाशामक औषधांच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे.