स्पॉन्डिलोसिस

स्पॉन्डिलोसिस: उपचार, लक्षणे आणि कारणे

स्पॉन्डिलोसिसची लक्षणे 

स्पॉन्डिलोसिस पाठीच्या कण्याच्या विशिष्ट भागांवर परिणाम करतो, जसे की मान (सर्व्हायकल), मधल्या पाठीचा भाग (थोरॅसिक) किंवा खालच्या पाठीचा भाग (लंबार). प्रभावित पाठीच्या कण्याच्या भागानुसार, स्पॉन्डिलोसिसची सर्वसामान्य लक्षणे अशी आहेत:

मान (सर्व्हायकल) भाग

  • खांदा किंवा हातापर्यंत पसरलेली मानदुखी
  • हाडांच्या वाढीमुळे मज्जातंतूंच्या मुळावर दबाव आल्यामुळे हात, मनगट किंवा पंजामध्ये अशक्तपणा
  • काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, सर्व्हायकल भागातील कण्यावरती हाडांच्या वाढीमुळे अन्न गिळण्यात अडचण

मधल्या पाठीचा (थोरॅसिक) भाग

  • सांधा पुढे वाकल्यानंतर किंवा हायपरएक्स्टेंड केल्यानंतर मधल्या पाठीच्या भागात जाणवणाऱ्या वेदना

स्पॉन्डिलोसिसची कारणे 

स्पॉन्डिलोसिस होण्यापाठी वेगवेगळी कारणे असू शकतात. तथापि, खालील तीन कारणे मुख्य आहेत:

  • वयानुसार ऱ्हास: वय-संबंधित झीज हे स्पॉन्डिलोसिसचे प्रमुख कारण आहे. वयानुसार पाठीच्या कण्याच्या डिस्कमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्या सुकतात, हर्नियेटेड होतात किंवा फुगतात आणि स्पॉन्डिलोसिसला कारणीभूत ठरतात.
  • पुन्हा पुन्हा वापर आणि अतिवापर: सतत वाकणे किंवा झुकणे अश्या शारीरिक क्रियांमुळे स्नायूंवरती नियमित ताण येऊ शकतो, जो कालांतराने स्पॉन्डिलोसिसमध्ये परिवर्तित होतो.
  • थेट दुखापत: अपघात किंवा पडण्यामुळे पाठीच्या कण्याला आणि शेजारच्या ऊतींना झालेल्या दुखापतीमुळे स्पॉन्डिलोसिस होऊ शकतो.अश्या दुखापतीच्या सुरुवातीच्या काळातील सूजमुळे झीज, सांध्यांतील वाढ, आणि स्पॉन्डिलोसिसशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

स्पॉन्डिलोसिसचे निदान 

स्पॉन्डिलोसिसची लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणांची चौकशी आणि शारीरिक तपासणी केल्याने डॉक्टरांना स्थितीबद्दल प्राथमिक कल्पना मिळू शकते.

नंतर वैद्यकीय तज्ञ एक्स-रे सारख्या चाचण्यांद्वारे पाठीच्या हाडांतील बदल तपासू शकतात किंवा कण्याच्या डिस्कचे तपशीलवार चित्र पाहण्यासाठी एमआरआय किंवा सीटी स्कॅन सुचवू शकतात. हालचाल करत असताना सांगाड्याची तपासणी करण्यासाठी देखील (जसे की मान/मणक्याला पुढे किंवा मागे वाकवताना) एक्स-रे केले जाऊ शकतात.

या निदान चाचण्या त्या हर्नियेटेड/बलजिंग डिस्क आणि हाडांच्या वाढीची समस्या ओळखू शकतात, ज्यामुळे कणाच्या जागा अरुंद होऊन मज्जातंतूंच्या मुळावर दाब येत आहेत.

स्पॉन्डिलोसिसचे उपचार 

तुमच्या वरच्या पाठीच्या वेदनांवर १००% शस्त्रक्रियाविना स्पाइनल डी-कंप्रेशन उपचाराने मात करा!

ANSSI च्या USA-पेटंट तंत्रज्ञानाद्वारे नॉन-सर्जिकल स्पाइनल डी-कम्प्रेशन उपचारासकट शस्त्रक्रियेशिवाय पाठीच्या विविध विकारांनी ग्रस्त ३५००+ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

ही USA जर्नल ऑफ क्लिनिकल रिसर्चद्वारे मान्यताप्राप्त शस्त्रक्रिया, स्टेरॉइड इंजेकशन्स आणि वेदनाशामक औषधांच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे.

Related Posts

Book an Appointment

We are Asia’s Fastest Growing Chain of Spine Clinics. Consult With our Spine Experts and Unlock your Pain Free Life

Step 1

Book Appointment with our Spine Expert

Step 2

Get Detailed Diagnosis and a Customized Treatment Plan

Step 3

Complete the Treatment and Unlock the Door to Pain Free Life