मणक्याच्या समस्या आणि पाठदुखी अशा दीर्घकालीन विकारांसाठी अनेकदा शस्त्रक्रिया किंवा स्पाइनल डिकंप्रेशन उपचार आवश्यक ठरतो. योग्य उपचार निवडण्यासाठी प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
शस्त्रक्रिया आणि स्पाइनल डिकंप्रेशन यापैकी योग्य पर्याय निवडणे हे रुग्णाच्या विशिष्ट स्थिती, वेदनेची पातळी आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते. योग्य उपचार निवडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे.
काही मूलभूत गोष्टी
सर्वप्रथम, स्पाइनल डिकंप्रेशन उपचार आणि मणक्यावरील शस्त्रक्रिया यामधील फरक जाणून घेऊया.
-
शस्त्रक्रिया
साध्या छोट्या छेदनांपासून ते गुंतागुंतीच्या मोठ्या सर्जरीपर्यंत, प्रत्येक मणक्यावरील शस्त्रक्रिया वेगवेगळी असते.
सामान्य सर्जरींमध्ये डिस्केक्टॉमी (हरनिएटेड डिस्क काढणे), लेमिनेक्टॉमी (कण्याच्या हाडांचा काही भाग काढून टाकणे) आणि स्पाइनल फ्यूजन (दोन किंवा अधिक कण्याच्या हाडांना जोडणे) यांचा समावेश होतो.
साधारणतः शस्त्रक्रियेचा उद्देश मज्जारज्जू (स्पाइनल कॉर्ड) किंवा मज्जातंतूं (नर्व्हस) वरील दाब कमी करणे, मणक्याला स्थिर करणे आणि वेदना कमी करणे हा असतो.
-
स्पाइनल डिकंप्रेशन
स्पाइनल डिकंप्रेशन हा शस्त्रक्रियेशिवाय होणारा उपचार आहे, जो मणक्याच्या डिस्क आणि तंतूंवरील दाब कमी करतो. हा उपचार कण्याच्या हाडांमध्ये नकारात्मक दाब निर्माण करतो, ज्यामुळे हरनिएटेड किंवा फुगलेल्या डिस्कला त्याच्या मूळ स्थानावर मागे खेचण्यास आणि बरे होण्यास मदत होते.
उपचारांची परिणामकारकता
वेगवेगळे घटक दोन्ही उपचारपद्धतींच्या परिणामकारकतेवर प्रभावी ठरू शकतात.
-
शस्त्रक्रिया
जेव्हा इतर उपचार पद्धतीं वेदना कमी करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो.
गंभीर हरनिएटेड डिस्क किंवा स्पाइनल स्टेनोसिससाठी शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी ठरू शकते. अनेक रुग्णांना वेदना कमी झाल्याचा अनुभव येतो आणि त्यांची कार्यक्षमता सुधारते. मात्र, ही परिणामकारकता रुग्णाच्या आरोग्याची स्थिती आणि शल्यचिकित्सकाच्या कौशल्यावर अवलंबून असते.
-
स्पाइनल डिकंप्रेशन
डिस्क हर्निएशन आणि सायटिका सारख्या स्थितींवर स्पाइनल डिकंप्रेशनने चांगले परिणाम दिसले आहेत. अनेक रुग्णांना उपचारानंतर वेदनांमध्ये लगेचच चांगला आराम मिळतो. काही अभ्यासांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले असले तरी, विविध स्थितींवरील दीर्घकालीन परिणामकारकता जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
धोके आणि रिकव्हरी
येथे शस्त्रक्रियेचा पर्याय अनेक रुग्णांसाठी जोखिमेने भरलेला ठरू शकतो.
-
शस्त्रक्रिया
मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये इन्फेकशन, रक्तस्राव, मज्जातंतूंना जखम, आणि भूल देण्याच्या प्रक्रियेतील जोखीम, यांसारखे धोके असतात.
रिकव्हरीचा कालावधी वेगवेगळा असतो. काही रुग्ण काही आठवड्यांत बरे होतात, तर काहींना पूर्ण बरे होण्यासाठी काही महिने लागतात.
याशिवाय, वेदना भविष्यांत परत येऊ नयेत यासाठी पोस्टऑपरेटिव्ह फिजिओथेरपीची शिफारस केली जाते.
-
स्पाइनल डिकंप्रेशन
स्पाइनल डिकंप्रेशन ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही चिरफाड नसल्यामुळे ती एक अधिक सुरक्षित पर्याय ठरते. याचे दुष्परिणाम साधारण सौम्य स्वरूपाचे असतात, जसे की उपचारादरम्यान किंवा नंतर सौम्य वेदना होणे.
बहुतेक रुग्ण त्वरित त्यांच्या दैनंदिन कामकाजात परत येऊ शकतात. मात्र, यशस्वी परिणामांसाठी अनेक आठवड्यांपर्यंत सतत उपचार घेण्याची आवश्यकता असते.
खर्च
उपचार निवडताना बहुतांश रुग्णांसाठी खर्च महत्त्वाचा असतो.
-
शस्त्रक्रिया
साधारणतः शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो, ज्यामध्ये रुग्णालयातील खर्च, शल्यचिकित्सकांची फी आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी यांचा समावेश होतो. आरोग्य विमा संरक्षण प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळा असते, आणि
शस्त्रक्रियेत काही गुंतागुंत झाल्यास अधिक खर्चही होऊ शकतो.
-
स्पाइनल डिकंप्रेशन
हा खर्च उपचार देणाऱ्यावर आणि आवश्यक उपचारांच्या प्रमाणावर अवलंबून असला तरी, स्पाइनल डिकंप्रेशन हा शस्त्रक्रियेपेक्षा तुलनेने एक स्वस्त पर्याय आहे.
ANSSI बद्दल:
आम्ही ANSSI Wellness मध्ये मणक्याच्या समस्यांने ग्रस्त असलेल्या त्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांच्यासाठी इतर पारंपारिक उपचार अयशस्वी ठरले आहेत. आधुनिक नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन उपचारांद्वारे रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास आणि सुरक्षित आणि प्रभावी वातावरणात बरे होण्यास मदत करण्यासाठी ANSSI वचनबद्ध आहे.
ANSSI Wellness शी कनेक्ट व्हा LinkedIn, Instagram, आणि Facebook वर, आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.